•गुरुचरित्र ||अध्याय अकरावा||
*!! श्री गणेशाय नमः !!* *!! श्री गुरूदेव दत्त !!* *श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध* *अध्याय अकरावा* *नृसिंह सरस्वती अवतार* श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार समाप्ती केल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या दृष्टांताची वर्णने मागील अध्यायात आली. पुढे अवतार परंपरा सांगण्याविषयी नामधारकांनी विनंती केल्यावर सिद्ध म्हणाले, एका विप्रस्त्रीची कथा तुला सांगितली होती. तिला शनि प्रदोष व्रत कर म्हणजे तुझ्या पोटी जगदवंद्य पुत्र जन्म घेईल असे वरदान दिले होते. त्या विप्रस्त्रीने त्याप्रमाणे गुरु उपदेशानुसार व्रत केले आणि मनात वासना असतांना ती पंचत्व पावली. इथेही गुरुवाक्य निष्ठेने पाळणे किती महत्वाचे आहे हे दिसते. आपल्या पोटी आदरणीय होणार पुत्र येणार. या गुरुवाक्याचा विश्वास ठेवून तिने आजन्म प्रदोषव्रत केले, पुत्र होणे एका विशिष्ट वयातच शक्य आहे. हे कुणालाही कळते पण ते वय उलटल्यावर पुत्र प्राप्ती शक्य नाही असे आपल्याच बुद्धीने निर्णय करून व्रत सोडणे. हे गुरूवर अविश्वास दाखवणे आहे. त्यातून गुरुनिष्ठेचे पोकळपण स्पष्ट होते. गुरु त्रिकालज्ञ असतात किंवा "गुरुवाक्य आपणा कारण", सत्...